दि.१९ ऑगस्ट २०२४
गडचिरोली:- काटली,गोगांव, साखरा, चुरचुरा या परिसरातील रेल्वे बांधकामात काम करणाऱ्या मजुरांचे तिन महिने लोटुनही सुद्धा काम केलेल्या कामाच्या मजुरीचे रुपये न मिळाल्याने हताश होऊन परिसरातील पंधरा विस मजुरांनी माजी खासदार तथा अनु.जनजाती मोर्चाचे अशोक जी नेते यांच्या गडचिरोली येथील निवासी जनसंपर्क कार्यालयात आज दिनांक १९ ऑगस्ट २०२४ ला सोमवारी भेट घेतली असता माजी खासदार अशोक जी नेते यांना मजुरांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत आम्ही वडसा गडचिरोली या रेल्वे मार्गाचे बांधकाम सुरु आहे, काटली, साखरा,चुरमूरा,गोगांव तसेच अनेक गावाच्या परिसरातील काम करुन लोकांचे मजुरीचे रूपये अजुन पर्यत मिळालेले नाही अशी मजुरांनी आपली आपबीती मा.खा.नेते यांना सांगितलं असता या बाबत गांभीर्याने लक्षवेधत मा.खा.नेते यांनी तात्काळ रेल्वेचे कंत्राटदार रमन सिंग व इंजिनिअर यांना दुरध्वनी द्वारे बोलून याबाबत काम केलेल्या मजूरांच्या मजुरी चे रूपये लवकरच देण्यात येईल. असा विश्वास कंत्राटदारांनी मा.खा. नेत